अवैधरित्या चोरट्या मार्गाने रेती वाहून नेणारा हायवा ट्रक भोकर पोलिसांनी पकडला6लाख 25 हजाराचा ऐवज जप्त
भोकर (तालुका प्रतिनिधी) भोकर शहरांमध्ये अवैधरित्या गौणखनिजाची वाहतूक करण्याचे प्रकार सुरू असून 24 डिसेंबरच्या रात्री भोकर म्हैसामार्गावर हायवा ट्रक मध्ये रेती भरून नेत असताना भोकर पोलिसांनी पकडून 6 लाख 25 हजाराचा ऐवज जप्त केला.
भोकर शहरात गेलीअनेक दिवसापासून रात्रीच्या वेळी रेती व मुरुमाचीअवैध वाहतूक करून रात्रीच्या वेळी हा धंदा सरळ चालतो यापूर्वी 3 दिवसापूर्वीमहसूल विभागाने हायवा ट्रक पकडून जप्त केला होता 24 डिसेंबरच्या पहाटे दोन वाजताच्या दरम्यान भोकर म्हैसा पॉइंटवरून रेती वाहून नेणारा हायवा पोलिसांना मिळून आला पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यादव, अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे, सुरज जाधव, उपअधीक्षक शपकत आमना यांच्या आदेशानुसार सपोनी शैलेंद्र औटी यांच्यासोबत पोहे का राजेंद्र कळणे प्रमोद जोंधळे मंगेश क्षीरसागर गुरुदास अरे वार यांनी या कामी परिश्रम घेतले 25 हजाराची रेती आणि 6 लाख रुपये किमतीचा हायवा जप्त करून पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला