Uncategorizedखेळ

नांदेड (प्रतिनिधी) एसटी विभाग नांदेड येथील कर्मचारी श्री पांचाळ करतात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची कामे करण्यास टाळाटाळ*

नांदेड (प्रतिनिधी) एसटी विभाग नांदेड येथील कर्मचारी श्री पांचाळ करतात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची कामे करण्यास टाळाटाळ*

*नांदेड (प्रतिनिधी) एसटी विभाग नांदेड येथील कर्मचारी श्री पांचाळ करतात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची कामे करण्यास टाळाटाळ

*कामे सुरळीत होत नसल्याने सुरळीत होत नसल्याने अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ*

एसटी महामंडळ विभागीय कार्यालय नांदेड अंतर्गत येणाऱ्या तालुक्यातील सर्व आगारातील अनेक कर्मचारी दर महिन्याला सेवानिवृत्त होत असतात त्यांच्या सेवानिवृत्तीचा प्रस्ताव भविष्य निर्वाह निधी औरंगाबाद यांच्या कार्यालयात सादर करावा लागतो तत्पूर्वी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांची ऑनलाईन माहिती ईपीएफओ प्रणाली मध्ये विभागीय कार्यालय नांदेड यांच्यामार्फत कर्मचाऱ्यांची सर्व माहिती समाविष्ट करून परिपूर्ण प्रस्ताव हा ऑनलाइन पद्धतीने विभागीय कार्यालय नांदेड यांच्या मार्फत पाठविणे आवश्यक असते असे असताना नांदेड येथील संबंधित विभागाचे श्री पांचाळ हे काम करुन देण्यास टाळाटाळ करून कर्मचाऱ्यांना श्री महाजन यांच्याकडे पाठवतात सदर महाजन हे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून आर्थिक हात मिळवणी करून जे कर्मचारी आर्थिक लाभ देतात त्याच कर्मचाऱ्यांची कामे ऑनलाईन प्रणालीमध्ये विभागीय कार्यालय नांदेड यांच्याकडून केली जातात जे कर्मचारी संबंधित कर्मचाऱ्यांना पैसे देत नाही तोपर्यंत त्यांच्या सर्व माहिती ही ऑनलाईन प्रणाली मध्ये नमूद केली जात नाहीत.


अशीच एक माहिती चे प्रकरनाचे निवेदन दिनांक 10/12/2024 रोजी माननीय विभाग नियंत्रक साहेब नांदेड विभाग यांच्याकडे देण्यात आले त्याचे सविस्तर वृत्त असे की, दत्ता गोविंदा गंगासागरे हे भोकर आगार येथून स्वच्छक या पदावरून नियत वयोमानानुसार दिनांक 30/04/ 2022 रोजी सेवानिवृत्त झाले होते त्यानंतर त्यांनी सन 2022 च्या मे महिन्यात ऑनलाईन पद्धतीने सेवानिवृत्तीचा प्रस्ताव ईपीएफो कार्यालकडे सादर केला केला त्यानंतर ईपीएफओ कार्यालयाने त्यांच्या सेवानिवृत्तीच्या प्रस्ताव ऑनलाइन सादर केला त्यानंतर त्यांच्या प्रस्तावात सेवानिवृत्तीची तारीख व रुजू दिनांक ही नमूद केलेली नसल्यामुळे त्यांचा प्रस्ताव रिजेक्ट करण्यात आला त्यानंतर संबंधित दत्ता गोविंदा गंगासागर यांनी विभाग नियंत्रक साहेब नांदेड यांच्या कार्यालयातील श्री पांचाळ साहेब यांच्याकडे जाऊन माझा प्रस्ताव ना-मंजूर झाला तुम्ही माझ्या ऑनलाईन प्रणालीमध्ये सेवानिवृत्ती दिनांक व रुजू दिनांक नमूद करा त्यानंतरच माझा प्रस्ताव मंजूर होईल अशी मी त्यांच्याकडे विनंती केली त्यांनी स्पष्ट शब्दा सांगितले की सदर काम हे माझ्याकडे नसून सदर काम हे महाजन मेकॅनिक यांच्याकडे आहे, तुम्ही त्यांना जाऊन भेटा त्यानंतरच तुमचे काम होईल असे सांगितल्याने मी महाजन साहेब यांना फोनवरून संपर्क साधला असता तुमचा प्रस्ताव मी तयार करून घेतो तुम्ही मला नांदेड येथे व औरंगाबाद येथे जाऊन तुमचे काम पूर्ण करून आणण्यासाठी माझ्याकडे पैशाची मागणी केली त्यानंतर मी दिनांक 30/09/20240रोजी ईपीएफओ कार्यालय नांदेड येथे जाऊन लेखी अर्ज दिला त्यांनी माझा अर्ज बघून त्यांनी मला स्पष्ट शब्दात सांगितले की रुजू दिनांक व सेवानिवृत्तीची दिनांक ही विभागीय कार्यालय नांदेड यांच्या कार्यालयातून ऑनलाईन प्रणालीमध्ये समाविष्ट करा त्यानंतर तुमचा प्रस्ताव हा मंजूर होईल.
तब्बल अडीच वर्षे पूर्ण होऊन सुद्धा माझे मला माझे हक्काच्या मिळणाऱ्या पेन्शनची रक्कम अद्याप पर्यंत मिळाली नाही त्याला संबंधित कार्यालयातील श्री पांचाळ साहेब हे जबाबदार आहेत त्यांच्यावर विभाग नियंत्रक हे कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे विभागीय नियंत्रक हे संबंधित कर्मचाऱ्याला कशा पद्धतीने न्याय मिळवून देतील याकडे सुद्धा सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button