महाराष्ट्र ग्रामीण

बांगलादेशात होत असलेल्या हिंदू वरील अत्याचारा विरोधात भोकर मध्ये विविध हिंदू संघटनांचा भव्य मूक मोर्चा

भोकर (तालुका प्रतिनिधी) बांगलादेशात होत असलेल्या हिंदू वरील अत्याचारा विरोधात भोकर मधील विविध हिंदू संघटनांच्या वतीने 10 नोव्हेंबर रोजी भव्य मूक मोर्चा काढून तहसीलदार यांच्या मार्फत पंतप्रधानांना निवेदन देण्यात आले.

बांगला देशातील अल्पसंख्यांक हिंदूंवर अन्याय अत्याचार केले जात असून तेथील महिला मुलीवर सुद्धा अत्याचार होतआहेत, बांगलादेशातील हिंदू संकटात असून केंद्र शासनाने हा अत्याचार त्वरित थांबवावा यासह अन्य मागण्यासाठी विविध हिंदू संघटनांनी एकत्र येऊन 10 डिसेंबर रोजी श्री बालाजी मंदिर येथून सर्व हिंदू बांधव महिला, पुरुष,युवक निघून किनवट रोड मार्गे तहसील कार्यालय येथे आले त्या ठिकाणी प्रा. डॉ. व्यंकट माने यांनी प्रास्ताविक केले बांगलादेशात होत असलेल्या हिंदू वरील अन्याय अत्याचाराविरुद्ध सर्व हिंदू समाज बांधवांनी संघटित होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी मांडले, महंत प्रभाकर बाबा कपाटे याने प्रखर विचार मांडले बांगला देशात हिंदूवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराविरुद्ध तुमचं रक्त सळसळत नाही का, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या देशासाठी हसत हसत फासावर चढले हा आपला इतिहास आहे, आज आपल्या देशात शाळेत जाणारी मुलगी सुद्धा सुरक्षित नाही त्यासाठी सावध होणे गरजेचे आहे जागृत व्हाअसे आवाहन त्यांनी केले, मुक्ताई नाथ दीदी यांनी रात्र वैऱ्याची आहे हिंदूंच्या रक्षणासाठी एकत्र येण्याची गरज आहे हे अत्याचार थांबले पाहिजेत असे विचार त्यांनी मांडले पिंपळगाव मठाचे मठाधिपती व्यंकट स्वामी महाराज यांनीही सर्व हिंदूंनी संघटित होण्याचे आवाहन केले यावेळी महंत उत्तम बन महाराज, चैतन्य बाबा कांडली आश्रम, रवी गुरु जोशी, चंद्रकांत जोशी, निर्मला ताई जामदरी, विठ्ठल महाराज शनी मंदिर, बापूराव पाटील, सतीश शहाणे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

पुरातन अवशेष नष्ट केल्या बाबत तहसीलदारांना निवेदन

बांगला देशातील हिंदूवर व महिला मुलींवर होत असलेल्या अत्याचाराबाबत तहसीलदार गुंडमार यांना सर्व हिंदू संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आले तसेच भोकर येथील किनवट रोडवर गट क्रमांक 45 मध्ये यादवकालीन शिव मंदिराच्या सभा मंडपा समोरील कलावंतींनचा महाल अज्ञात लोकांनी नष्ट केला असून ते अवशेष पूर्ववत त्या ठिकाणी उभारण्यात यावेत अशा मागणीचेही निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. भोकर शहर बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते त्यानुसार सकाळपासून सर्व दुकाने प्रतिष्ठाने हॉटेल कडकडीत बंद होते दुपारनंतर दुकाने उघडण्यात आली यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button